*कोठली येथे महात्मा फुले वाचनालयाचे उदघाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोठली येथे महात्मा फुले वाचनालयाचे उदघाटन*
*कोठली येथे महात्मा फुले वाचनालयाचे उदघाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचन कक्षाचे उदघाटन, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष तसेच स्मृतीदिनानिमित्त कोठली ता.शहादा येथे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून सुरेश आनंदा माळी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आसाराम दयाराम माळी हे होते. यावेळी सुभाष वारुळे, भटू हिलाल माळी, प्रा. ज्ञानेश्वर गवळे, वीरेंद्रसिंग गिरासे, अशोक पंडित माळी, गोकुळ माळी, स्वप्नील माळी, बाळू दीक्षित यांच्यासह वाचनालयाचे संस्थापक ग्रंथमित्र प्रवीण महाजन हे उपस्थित होते.
ग्रंथमित्र प्रवीण महाजन यांनी स्थापन केलेल्या या वाचनालयात तब्बल 550 पेक्षा अधिक पुस्तके उपलब्ध असून दररोज वृत्तपत्र वाचनासाठी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी वाचनसेवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रवीण महाजन यांनी केले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात असून त्या अंतर्गत महात्मा फुले वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक आसाराम माळी यांनी केले तर आभार संचालक उमेश बन्सीलाल माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हितेश माळी, ग्रंथपाल गोपाल अजबसिंग गिरासे यांचे सहकार्य लाभले.



