ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*

  • Share:

*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार  येथील श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न. संविधान सन्मान योजना परीक्षेचा निकाल जाहीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पेन देऊन गौरव.
श्रीमती हि. गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख प्रा. नितीन देवरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बालकांचे हक्क, बालसुरक्षा आणि बालविवाह प्रतिबंध याविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुख्य लोक अभिरक्षक अॅड. सीमा खत्री आणि सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. शुभांगी चौधरी उपस्थित होत्या.
यावेळी अॅड. शुभांगी चौधरी यांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, बालकांचे मूलभूत हक्क आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या विविध तरतुदी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहून अन्याय अथवा अनुचित प्रसंग घडल्यास योग्य यंत्रणांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अॅड. सीमा खत्री यांनी ‘बालविवाह मुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना बालविवाहामुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. बालविवाह रोखण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, बालविवाहाची माहिती मिळाल्यास करावयाची कार्यवाही, तसेच पोलीस प्रशासन आणि न्यायालयाची मदत कशा प्रकारे घेता येते, याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली.
संविधान सन्मान योजना परीक्षेचा निकाल जाहीर, भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान योजना’ सामान्य ज्ञान परीक्षेचा निकालही याच कार्यक्रमाच्या निमित्ताने घोषित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि लोकशाहीप्रती आदर निर्माण व्हावा, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश होता. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पेन देऊन गौरविण्यात आले. या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून बालहक्क, बालसुरक्षा आणि बालविवाह प्रतिबंध या विषयांबाबत उत्सुकता दर्शविली. वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. नितीन देवरे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सुरक्षित बालपण आणि बालविवाह मुक्त भारताची निर्मिती ही काळाची गरज असून, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश पाटील यांनी केले. या जनजागृतीपर कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकांचे हक्क, सुरक्षित बालपण, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती आणि भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक असा दुहेरी संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
November, 28 2026
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
November, 28 2026
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
November, 28 2026
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
November, 28 2026
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
November, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज