*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उपशिक्षक तुकाराम भील होते. तर प्रमुख वक्ते विलास मगरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच
प्रमुख वक्ते विलास मगरे यांनी महात्मा जोतिबा फुलेंच्या संपूर्ण जीवनपट सांगत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील
योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, जोतिबांच्या कार्याला
त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभल्यामुळेच त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवून शकले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम भील यांनी सांगीतले की, महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्ह्यात झाला. ते खूप हुशार होते. त्यांनी 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून प्रचलित समाज व्यवस्थेला आव्हान दिले.
तेथे शिकविण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला तयार केले. त्याच्या बरोबर फातिमा शेख नावाच्या मुस्लीम शिक्षिका सुद्धा होत्या. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यासारखे ग्रंथ लिहिले. त्याचबरोबर त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी
सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अशा या महामानवाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी दुखद निधन झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार संदीप मोरे यांनी मानले. तसेच फलक लेखन सुदाम जांभोरे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उमेश पाटील, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, विलास पाडवी, संतोष राठोड मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



