*आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते तीन कोटी 91 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते तीन कोटी 91 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
*आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते तीन कोटी 91 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
करण्यात आले. यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, कोयलीविहीरच्या सरपंच जवराबाई पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकास कामांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अक्कलकुवा तालुक्यातील जांबीपाणी येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भुमीपुजन, करणपाडा येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भुमीपुजन, मोरांबा येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भुमीपुजन, महुखाडी येथे दहा लक्ष खर्चाच्या सभामंडपाचे भुमीपुजन, शेंदवाण येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भुमीपुजन, शेंदवाण येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले तर, रामपूर येथे जनसुविधा अंतर्गत दहा लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभुमी बांधकाम करणे, रामपूर येथे अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले, तालंबा येथे अमरसिंग इंद्रसिंग वळवी यांच्या शेतात 15 लाख रुपये खर्चाच्या शेतपाणंद रस्ता भुमीपुजन करण्यात आले, तालंबा येथे विशाल तडवी यांच्या शेतात 15 लक्ष रुपये खर्चाच्या शेत पाणंद रस्ता भुमीपुजन करण्यात आले, तालंबा येथे लक्ष रुपये खर्चाच्या सार्वजनिक विहीरीचे भुमीपुजन करण्यात आले, गव्हाळी येथे दहा लाख रुपये खर्चाचे आर. ओ. फ़िल्टरचे लोकार्पण करण्यात आले, डोडवा येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या आर. ओ. फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले, नवापाडा येथे दहा लाख रुपये खर्चाच्या आर.ओ. फ़िल्टरचे लोकार्पण करण्यात आले, नवापाडा येथे दहा लाख रुपये खर्चाचे सभामंडपाचे भुमिपुजन करण्यात आले, उमरकुवा येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या आर.ओ. फिल्टर लोकार्पण करण्यात आले, पेचरीदेव येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप भुमिपुजन करण्यात आले, पेचरीदेव येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या आर.ओ. फ़िल्टरचे लोकार्पण करण्यात आले, पेचरीदेव येथे जनसुविधा अंतर्गत दहा लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभुमीचे बांधकाम सुरु कामाचे भूमिपूजन करण्यात आले, नवागाव येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले, पोरांबी येथे दहा लाख रुपये खर्चाच्या सभामंडप भुमीपुजन करण्यात आले, पोरांबी येथे 15 लक्ष रुपये खर्चाच्या पाणंद रस्ता भूमिपूजन करण्यात आले, खडकुना येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामडपाचे भुमीपुजन करण्यात आले, खडकुना येथे जनसुविधा अंतर्गत दहा लाख रुपये खर्चाच्या स्मशानभुमी बांधकाम कामाचे भूमिपूजन करण्यात आले, डोंगरीपाडा येथे आठ लाख रुपये खर्चाच्या सार्वजनिक विहीरीचे भुमी पुजन करण्यात आले, उदेपूर येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप कामाचे भुमीपुजन करण्यात आले, चांदपुर येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप कामाचे भुमीपुजन करण्यात आले, ब्राम्हणगाव येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप कामाचे भुमीपुजन करण्यात आले, कडवामहु येथे दहा लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडप कामाचे भुमीपुजन करण्यात आले, कडवामहू येथे जनसुविधा अंतर्गत दहा लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभुमी बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले गावात विविध विकास कामांचे भुमीपुजन व कामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले, या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उप सरपंच, माजी जि. प. सदस्य, पं. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसैनिक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या विकास कामांमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.



