*नंदुरबार येथे संताजी जगनाडे महाराजांची 402 वी जयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी होणार!जन्मोत्सव,भव्य मिरवणूक,पालखी सोहळा,विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व पारितोषिक वितरणाचे आयोजन-मा.आ.शिरà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे संताजी जगनाडे महाराजांची 402 वी जयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी होणार!जन्मोत्सव,भव्य मिरवणूक,पालखी सोहळा,विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व पारितोषिक वितरणाचे आयोजन-मा.आ.शिरà
*नंदुरबार येथे संताजी जगनाडे महाराजांची 402 वी जयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी होणार!जन्मोत्सव,भव्य मिरवणूक,पालखी सोहळा,विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व पारितोषिक वितरणाचे आयोजन-मा.आ.शिरीष चौधरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तेली समाजाचे आराध्य दैवत, संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 402 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात 8 डिसेंबर 2026 रोजी भव्य-दिव्य स्वरूपात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव, प्रतिमा पूजन, भव्य मिरवणूक, आकर्षक पालखी सोहळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात अनुभवायला मिळणार आहे.
संताजी महाराजांचे विचार, त्यांचे आध्यात्मिक योगदान, संत साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच समाजातील एकता, संघटन आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने नंदुरबार तेली समाजाच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन जयंती उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तेली कर्मचारी संघ, नंदुरबार यांच्या वतीने 6 डिसेंबर 2026 रोजी सहकार महर्षी श्री. स.म.श्री.पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. संताजी महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे विचार, संत साहित्य आणि सामाजिक योगदान यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ 8 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता तैलिक मंगल कार्यालय, नंदुरबार येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून,पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच संतांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा विशेष प्रयत्न असणार आहे.
भव्य मिरवणूक व आकर्षक पालखी सोहळा, दुपारी 2 वाजेपासून नंदुरबार शहरातून संताजी महाराजांची भव्य मिरवणूक व पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, भजन, लेझीम पथकांचे आकर्षक सादरीकरण, संताजी महाराजांचा जयघोष आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून जाणार आहे. या मिरवणुकीत समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून, पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सोहळा नंदुरबार करांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर तैलिक मंगल कार्यालय येथे समाजबांधवांसाठीस्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजबांधवांसाठीआकर्षक पारंपरिक ड्रेस कोड, जयंती उत्सवाचे वेगळेपण आणि एकसंधता जपण्यासाठी समाजबांधवांसाठीविशेष ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. बंधूंसाठी पांढरा शर्ट, छापील टोपी व निळ्या रंगाची पॅन्ट. भगिनींसाठी पिवळी साडी, नथ, चंद्रकोर टिकली व केशरी फेटा. या पारंपरिक वेशभूषेमुळे मिरवणुकीला विशेष शोभा प्राप्त होणार असून समाजाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडणार आहे.
समाजाच्या एकतेचे आणि संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा सोहळा! संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजाला भक्ती, समता, सदाचार, परिश्रम आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यावे, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि नव्या पिढीला संस्कार व प्रेरणा द्यावी, हा या जयंती उत्सवामागील व्यापक दृष्टिकोन आहे. या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्याला नंदुरबार शहरासह परिसरातील सर्व समाजबांधव, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. प्रत्येकाने या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून संताजी महाराजांचा जन्मोत्सव भक्तिभावाने, उत्साहाने आणि सामाजिक एकतेच्या भावनेतून साजरा करावा, असे आवाहन नंदुरबार तेली समाजाचे अध्यक्ष मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी केले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेली समाज संस्थान, नंदुरबार तेली समाज, तेली कर्मचारी संघ, तेली महिला आघाडी, तेली युवक आघाडी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि समाजबांधव परिश्रम घेत आहेत.



