*लाखापुर माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन, शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन, विद्येच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन, शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन, विद्येच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश*
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन, शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन, विद्येच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश*
तळोदा(प्रतिनिधी):-विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.”क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर, तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील लाखापुर माध्यमिक विद्यालयात क्रांतिसूर्य, ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विचारांना उजाळा देत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान जीवनकार्याचा, शैक्षणिक क्रांतीचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षाचा सविस्तर परिचय करून दिला. पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून माणसाला स्वाभिमान, विवेक, समानता आणि सामाजिक न्यायाची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन, ज्ञानार्जन आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करावी. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासोबतच समाजाच्या प्रगतीतही योगदान द्यावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भामरे यांनी केले, तर विनोद राणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, मंगल पावरा, विनोद राणे, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, विनोद भिल आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.



