ताजा खबरे:
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*

  • Share:

*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आदिवासी युवक-युवतींना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनाही ‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटासाठी ‘अमृत ड्रोन मिशन’ राबविण्यात येत आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सर्वेक्षण आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. AMRUT– TRTI यांच्यातील सामंजस्य करारानुसार TRTI मार्फत पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही या प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आदिवासी युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य आत्मसात करून करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि व्यावसायिक कौशल्यांचा समावेश असेल. शेतीमध्ये फवारणी, पीक निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, मॅपिंग तसेच विविध तांत्रिक सेवांसाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याने प्रशिक्षित ड्रोन पायलटसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रशिक्षणानंतर नोकरीसोबतच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराची संधीही मिळू शकते. अमृत आणि TRTI यांच्यातील या सहकार्यामुळे आदिवासी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत होणार असून, कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन TRTI तर्फे श्री. निलेश सागर यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहिती व अर्जासाठी www.amrutdronemission.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे (९११२२२८७७१) यांच्याशी संपर्क साधावा.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
November, 27 2026
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
November, 27 2026
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज