*लाखापुर माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा, संविधान सन्मान रॅलीतून संविधानिक मूल्यांचा जागर, प्रश्नमंजुषा, व्याख्यानमाला व उद्देशिका वाचनाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा, संविधान सन्मान रॅलीतून संविधानिक मूल्यांचा जागर, प्रश्नमंजुषा, व्याख्यानमाला व उद्देशिका वाचनाचे आयोजन*
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा, संविधान सन्मान रॅलीतून संविधानिक मूल्यांचा जागर, प्रश्नमंजुषा, व्याख्यानमाला व उद्देशिका वाचनाचे आयोजन*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, नागरिकांमध्ये संविधानाबद्दल आदरभाव वाढावा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा जागर व्हावा म्हणून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षक विनोद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधानातील मूल्ये आत्मसात करण्याचा संकल्प केला. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानविषयक ज्ञान वृद्धिंगत व्हावे, यासाठी उपशिक्षक मंगल पावरा यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानावर आधारित बहुपर्यायी प्रश्नमंजुषा परीक्षेचे आयोजन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था व संविधानिक मूल्यांची माहिती मिळाली.
याप्रसंगी उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता जपणारी बंधुता या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. संविधान व्याख्यानमालेत उपशिक्षक अनिल भामरे यांनी भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक निर्मिती प्रक्रियेची माहिती देत संविधानातील 395 कलमे व 12 परिशिष्टांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक संजय पाटील यांनी भारतीय नागरिक म्हणून संविधानाचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे, नियमांची जाणीव ठेवणे आणि जबाबदार नागरिक बनणे याचे महत्त्व अधोरेखित केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पोस्टर, बॅनर व घोषवाक्यांसह ‘संविधान सन्मान रॅली’ काढण्यात आली. ‘संविधान बचाव, देश बचाव’, ‘संविधानाचा सन्मान, देशाचा अभिमान’, ‘समता, स्वातंत्र्य, बंधुता लोकशाहीची खरी शक्ती’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या या रॅलीने पालक व नागरिकांचे लक्ष वेधून घेत संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संसद प्रतिकृती तसेच आकर्षक व प्रेरणादायी संविधान दिन फलकलेखन करण्यात आले. याचे रेखाटन उपशिक्षक फिरोजअली सय्यद व मंगल पावरा यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विनोद राणे यांनी केले, तर आभार चंदू पाडवी यांनी मानले. संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चंदू पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, सागर पाडवी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.



