*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-मुंबई आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली "दादर - रत्नागिरी" पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावली आहे. रेल्वेमार्गांची मर्यादित क्षमता, दादर स्थानकावरील अपुऱ्या सुविधा आणि दिवा - दादर दरम्यान मार्ग उपलब्धतेतील अडचणी अशी कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत. मात्र इतर मार्गावर नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला जात असताना कोकणच्या हक्काच्या गाडीला नकार दिल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जल फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीमधून रेल्वे प्रशासनाची ही भुमिका समोर आली आहे. ही गाडी बंद झाल्या नंतर उत्तर भारतात जाणाऱ्या गोरखपूर - दादर यांसारख्या नवीन गाड्यांच्या संचालनाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप कोकणी प्रवाशांकडून होत आहे इतर मार्गावर गाड्या सुरु होऊ शकतात मग कोकणासाठी क्षमतेचा आणि जागेचा प्रश्न कसा निर्माण होतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ रेल्वे गाडी नसून मुंबईकर कोकणी माणसाची गावाशी जोडणारी हक्काची जीवनवाहिनी होती. असे निवेदनात म्हटले आहे. सण- उत्सव, लग्नसमारंभ किवा शेतीच्या कामासाठी मुंबईतून कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना नियमित व सोयीस्कर रेल्वे अभावी दरवेळी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. यापूर्वी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विविध संस्थानी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ नकारघंटाच मिळत आहे.



