*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
नांदेड(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री सम्रध्द पंचायतराज अभियान 2.0 ची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश नायगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी तालुकास्तरीय कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिली. शासनाच्या आदेशानुसार गाव पातळीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध योजनांची माहिती व कामे झाली पाहिजे यासाठी 23 रोजी नायगाव तालुका पंचायत समिती सभागृहात तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी ग. वि.अ. प्रविण वानखेडे,सहाय्यक ग.वि.अ. ऋकेश पाटील, विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, गणेश टोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पटवेकर, मुखेडकर, अजय कदम, जगननाथ मुंडकर आदींची उपस्थिती होती.प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला तसेच गतवर्षी प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कोलंबी ग्रामपंचायत अधिकारी व केंद्र चालकाचा सन्मान करण्यात आला
यावेळी प्रशिक्षण देत असताना
सुशासन पंचायत, सक्षम पंचायत
दलसम्रध्द पंचायत हरीत ग्राम
पारदर्शक कारभार,कर वसूली, पाणी पट्टी, स्वावलंबी पंचायत
, शासवत निधी, CRS लोकवर्गणी
जलकामासाठी, स्वावलंबी पंचायत
जलसम्रध्द, शोषखड्डे, मनरेगा कामे
ग्रामसभा, पाणी आराखडा, पाणी समिती, उपजीवीका, सामाजिक न्याय, ठझस कार्य आणि लाभ, लोकसहभाग श्रमदानं,सी सी टिव्ही कैमरे बसवीणे आदी विषयावर अजय कदम ग्रा. पं. अधिकारी अजय कदम आणि जगन्नाथ मुंडकर यांनी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पटवेकर यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव तसेच आयुष्यमान कार्डचे महत्व या विषयावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पटवेकर यांनी दिली. या कार्यशाळेला ग्रामपंचायत अधिकारी टि.जी. रातोळीकर, नागेश यरसनवार, सुर्यकात बोडले, साईनाथ चव्हाण, दिलीप खैरनार, प्रल्हाद गोरे, डी एस रेडेवाड, यादव सुर्यवंशी, संगेवार, माने, तालुका व्यवस्थापक गौतम चिंतोरे, शेख मुस्ताक, केंद्रचालक गणेश चोंडे, हणमंत कोकुर्ले, गंगाधर गंगासागसरे, मारोती कदम, अनिल कांबळे, पांडुरंग बनसोडे, संभाजी उपासे, सरपंच प्रतिनिधी रंजित कुरे यांसह इतर ग्रामपंचायत अधिकारी केंद्रचालक सरपंच आदीजण उपस्थित होते.



