*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा*
*फुपेरे भोवडवाडीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे फुपेरे येथील भोवडवाडीतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात 21 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही भोवडवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने या उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. पहाटे पासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सकाळी वारकरी दिंडी, श्री विठ्ठल -रखुमाईची पूजा -अर्चा आणि आरती अशा धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात झाली. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी हळदीकुंकू समारंभ तसेच सौ. लक्ष्मी शांताराम भोवड यांच्यावतीने उपासना यज्ञ संपन्न झाला.
सायंकाळी सहा वाजल्यापासून पंचक्रोशीतील गावातील स्थानिक विविध भजन मंडळांनी आपल्या सुमधुर भजन सेवेने उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब केले. रात्री दहा वाजता श्री हनुमान सेवा नाट्य नमन मंडळ, राऊत वरची वाडी, आंगले यांच्या बहुरंगी नमन कार्यक्रमाने उत्सवाची रंगत अधिकच वाढवली. या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उत्सवाच्या निमित्ताने भोवडवाडीतील ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी, महिला, युवक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा जपणारा हा उत्सव सर्वांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला. या संपूर्ण उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी भोवडवाडी उत्कर्ष मंडळ, फुपेरेचे कार्यकारिणी सदस्य, सल्लागार, उत्सव समिती सदस्य प्रणित परशुराम भोवड, किरण भिकाजी भोवड, दिनेश बबन भोवड, धनंजय प्रकाश भोवड, मनोज लाडकोजी भोवड, राजकुमार संतोष दिवाळे, कार्याध्यक्ष नामदेव भानाजी भोवड, शांताराम धोंडू भोवड तसेच शंकर भोवड, शशिकांत भोवड, बबन भोवड, महेश भोवड आणि शांताराम भोवड आदी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, परंपरा आणि गावाच्या एकजुटीचा सुंदर संगम घडविणारा कार्तिकी एकादशीचा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.



