*निवड श्रेणी प्रशिक्षण डाएट येथे उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवड श्रेणी प्रशिक्षण डाएट येथे उत्साहात संपन्न*
*निवड श्रेणी प्रशिक्षण डाएट येथे उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे दहा दिवसाचे निवड श्रेणी प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाली. 22 नोव्हेंबर दिनांक रविवारी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डायटचे प्रभारी प्राचार्य सौ प्रतिभा भावसार होते. या समारोपी प्रसंगी डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याते डॉ रमेश चौधरी, केंद्र समन्वयक प्रियांका पाटील, तंत्रशिक्षक देवेंद्र बोरसे तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करणारे सर्व सुलभक आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये शिक्षण उपसंचालक मोहन देसले यांनी ऑनलाईन शिक्षकांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी पण आपल्या अध्यापनात बदल करून स्वतःला अपडेट करून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशी सूचना दिली. समारोप कार्यक्रमांमध्ये डॉक्टर रमेश चौधरी यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना आपल्या अध्यापन पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना समजून योग्य ते मार्गदर्शन करावे आणि प्रशिक्षण काळात पण शिकलेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी करावा अशी सूचना दिली. केंद्र समन्वयक प्रियांका पाटील यांनी आई ही कविता सादर केली. शिक्षकांनी प्रशिक्षण काळात संपूर्ण वेळ नियमांचे पालन केल्याबद्दल आभार मानले. सदर कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी शिक्षक बंद भगिनींना मार्गदर्शन करणारे सुलभक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी नियमांचे पालन करून संपूर्ण प्रशिक्षण व्यवस्थितपणे घेतले म्हणून सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिभा पावसा यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्यापन पद्धतीत बदल करून नवीन अध्यापन पद्धतीने आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव राजभोज यांनी केले. परिचय व सत्कार एस एन पाटील यांनी केले तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले.



