*YESummit अंतर्गत पुणे येथे आयोजित हॅकाथॉन स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी, दोन उद्योजकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*YESummit अंतर्गत पुणे येथे आयोजित हॅकाथॉन स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी, दोन उद्योजकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड*
*YESummit अंतर्गत पुणे येथे आयोजित हॅकाथॉन स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी, दोन उद्योजकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुणे येथे आयोजित YESummit अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतीपूरक प्रक्रिया उद्योगांशी संबंधित पाच उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत एकूण आठ विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील दोन उद्योजकांनी विजेतेपद मिळविले आहे. या यशामुळे याकुब कोकणी (मशरूम प्रक्रिया उद्योग, नवापूर) तसेच योगिता चौधरी व रामकृष्ण चौधरी (मिरची पावडर व मसाला प्रक्रिया उद्योग, नंदुरबार) यांची 4, 5 व 6 मार्च 2027 रोजी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय YESummit साठी निवड झाली आहे.
स्पर्धेत सहभागी उद्योजक, दिलीप पाडवी मिलेट्स प्रक्रिया उद्योग धडगाव, किरण वळवी हळद प्रक्रिया उद्योग तळोदा, निर्मला पाडवी व बतुसिंग पाडवी तांदूळ प्रक्रिया उद्योग शहादा, योगिता चौधरी व रामकृष्ण चौधरी मिरची पावडर व मसाला प्रक्रिया उद्योग नंदुरबार, याकुब कोकणी मशरूम प्रक्रिया उद्योग नवापूर, नंदुरबार जिल्ह्यातील कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारी ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद आहे, या यशामुळे जिल्ह्यातील शेतकरी, महिला उद्योजक आणि नवउद्योजकांना कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून व्यवसायवृद्धी व मूल्यवर्धनासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.



