ताजा खबरे:
*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
*21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करा - स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी*
*शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*

  • Share:

*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर 2026-27 मध्ये ‘एल निनो’ (El Niño) प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती बाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नळवे खुर्द ता. जि. नंदुरबार येथे प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती रॅली व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शाश्वत उपाययोजना सुचवल्या.हवामान बदलाचा शेती व दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढली. घोषणाबाजी, फलक व संवादाच्या माध्यमातून पाणी बचत, पीक नियोजन आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याबाबत ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले. रॅलीनंतर विद्यार्थ्यांच्या पथकाने गावातील अनुभवी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या संवादातून खालील प्रमुख बाबी समोर आल्या, अनिश्चित पाऊस व पाणीटंचाई: पावसाचे बदलते वेळापत्रक आणि भूजल पातळी खालावण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीक उत्पादनावरील परिणाम: वाढते तापमान आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा झाली.
खर्च व जोखीम: बदलत्या हवामानात कीड -रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शकांनी खालील उपाययोजना सुचवल्या, पाणी साठवण व काटकसर: शेततळे, बंधारे, जलसंधारणाची कामे आणि ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर करणे. हवामानानुकूल पीक पद्धती: कमी पाण्यात येणारी, दुष्काळ प्रतिरोधक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे. मृदा व पर्यावरण संवर्धन: सेंद्रिय खतांचा वापर, आच्छादन आणि वृक्षलागवडीद्वारे जमिनीतील ओलावा टिकवणे.
या उपक्रमास नळवे खुर्दच्या सरपंच सौ. सरूबाई रोशन नाईक आणि ग्रामसेवक दक्षा उत्तम बैसाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण मोहिमेत सहभागी झालेल्या 40 विद्यार्थ्यांना के. एस. गर्दे आणि रोहन पाडवी यां शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
November, 21 2026
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
November, 21 2026
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
November, 21 2026
*21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करा - स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी*
November, 20 2026
*शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*
November, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज