*21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करा - स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करा - स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी*
*21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करा- स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी*
मुंबई(प्रतिनिधी):-छठपूजेच्या निमित्ताने 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर भोजपुरी गाणी प्रसारित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करण्यात यावे, अशी मागणी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात समितीच्या वतीने मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
छठपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्या राज्यातील प्रवाशांच्या भावनांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने भोजपुरी गाणी प्रसारित करण्याची व्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सांस्कृतिक परंपरेचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींचा सन्मान राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 21 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस महाराष्ट्रगीत प्रसारित करण्याची व्यवस्था करावी, अशी भूमिका समितीने निवेदनातून मांडली आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा सन्मान राखण्याच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. यावेळी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी आमरेश पाथरे, जयराम वीर, रितेश धुरी, सुभाष थोरात, सचिन सूर्यवंशी आणि वीराज वीर उपस्थित होते.



