*दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील शंभर टक्के अर्जांची निवड, 87 हजार 174 शेतकऱ्यांना मिळणार लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील शंभर टक्के अर्जांची निवड, 87 हजार 174 शेतकऱ्यांना मिळणार लाभ*
*दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील शंभर टक्के अर्जांची निवड, 87 हजार 174 शेतकऱ्यांना मिळणार लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैयक्तिक शेततळे घटकांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील 100 टक्के अर्जांची निवड करण्यात आली असून, राज्यातील एकूण 87 हजार 174 शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
पर्जन्याधारित शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनामार्फत अनुदान तत्त्वावर वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. सन 2026 -27 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढविण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र अर्जांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवर्गनिहाय निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे,
अनुसूचित जाती 3 हजार 925, अनुसूचित जमाती 5 हजार 379, इतर प्रवर्ग 77 हजार 870 असे एकूण 87 हजार 174 शेतकरी झाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे महा- डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. यामध्ये हमीपत्र (परिशिष्ट -2), आवश्यकते नुसार जातीचा दाखला तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी लघुसंदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. अपलोड करण्यात येणारी कागदपत्रे सुस्पष्ट व अद्ययावत असावीत. विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात येईल. पुढील प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरील लघुसंदेश तसेच महा-डीबीटी पोर्टलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. निवड झाल्यानंतर पूर्वसंमती प्राप्त करून योजनेतील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून विहित मुदतीत शेततळ्याचे काम पूर्ण करणारे शेतकरीच अनुदानास पात्र राहतील, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.



