*शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*
*शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळाचे विखरण येथील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी दिन साजरा करण्यात आला.आजच्या दिवशी 1967 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाची स्थापना झाली होती.या दिवसाचे महत्त्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी असल्याचे मत शिक्षकेतर कर्मचारी एस.जी. पाटील यांनी व्यक्त केले.मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिकादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. शाळेचे कार्यालयीन कामकाज, शासकीय पत्रव्यवहार, विद्यार्थी प्रवेश, अभिलेखांची जपणूक, परीक्षा व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा व स्वच्छता, परसबाग, शालेय परिसर स्वच्छता अशा विविध जबाबदाऱ्या ते निष्ठेने पार पाडतात. शिक्षकेतर कर्मचारी हे शाळेच्या कार्यव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ असून त्यांच्या सहकार्यामुळे शाळेचे कामकाज सुरळीत चालते आणि विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव, श्रमांचा सन्मान आणि योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे महत्वाचे आहे. यावेळी जयेश पाटील, दिनेश पाटील, सुनील पाटील, हेमंत खैरनार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. मराठे तर आभार प्रदर्शन व्ही.बी.अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.व्ही.नांद्रे, डी. बी.भारती,एम.डी.नेरकर, वाय.डी. बागूल,डॉ.आर. आर. बागुल, ए. एस.बेडसे, एस. एच. गायकवाड आदींनी संयोजन व सहकार्य केले.



