*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक चालली आहे शिक्षण विभागाच्या अधिकृत ताज्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत (2021-22 ते 2025-26) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल 17634 विद्यार्थ्यांची (सुमारे 24 %) पटसंख्या घटली आहे पुरेशा पटसंख्या अभावी या पाच वर्षांत जिल्ह्यातील 131 शाळांना कायमस्वरूपी टाळे लागले आहे.
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक 27 शाळा बंद पडल्या असून त्याखालोखाल चिपळूण आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 21 शाळांना टाळे लागले आहे. रत्नागिरी तालुक्यात केवळ दोन शाळा बंद झाल्या असल्या तरी विद्यार्थी संख्या तब्बल 2297 ने कमी झाली आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेले स्थलांतर,घटता जन्मदर आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा वाढलेला ओढा यामुळे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या झपाट्याने रोडावत चालली आहे त्यातच आता 1 ते 5 पटसंख्या असलेल्या सुमारे 400 हून अधिक शाळांच्या समायोजनाचा (विलीनीकरणाचा) प्रस्ताव असल्याने ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



