*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
पुणे(प्रतिनिधी):-दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण. मात्र हा आनंद केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच खऱ्या दिवाळीचे सार आहे, हा सामाजिक संदेश देत सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महा.) पर्वती विभागाच्या वतीने यंदाची दिवाळी कात्रज, गुजर- निंबाळकरवाडी येथील ममता फाउंडेशनमधील HIV बाधित मुलांसोबत मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत त्यांना प्रेम, आपुलकी आणि मायेची ऊब देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. दिवाळीचा फराळ, आनंदाचे क्षण आणि स्नेहपूर्ण सहवास यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या उपक्रमाचे खरे समाधान ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःपुरते जगण्याची प्रवृत्ती वाढत असताना, समाजातील गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचा सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
समाजसेवा ही केवळ मदत करण्यापुरती मर्यादित नसून, माणुसकी जपण्याची आणि माणसांना माणसांशी जोडण्याची भावना आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या उपक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि देणगीदार यांचे मनःपूर्वक आभार! सह्याद्री कुणबी संघाच्या माध्यमातून भविष्यातही असेच सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
दिवाळीचा खरा प्रकाश दिव्यांमध्ये नसतो, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात असतो.



