*आमदारांच्या गावाकडे जाणा-या रस्त्याची दुरावस्था, खांडबारा ते डोकारे कारखाना रस्ता झाला धोकादायक, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करा,बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदारांच्या गावाकडे जाणा-या रस्त्याची दुरावस्था, खांडबारा ते डोकारे कारखाना रस्ता झाला धोकादायक, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करा,बिरसा फायटर्सची मागणी*
*आमदारांच्या गावाकडे जाणा-या रस्त्याची दुरावस्था, खांडबारा ते डोकारे कारखाना रस्ता झाला धोकादायक, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करा,बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ते डोकारे साखर कारखाना, नवापूरपर्यंतच्या अंदाजे 35 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करून तात्काळ दुरुस्ती करा, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून, संबंधित अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून, जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, नवापूर तालुक्यातील खांडबारा ते डोकारे साखर कारखाना, नवापूरपर्यंतचा अंदाजे 35 किलोमीटर लांबीचा रस्ता, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण व खडीकरण करण्यात आलेला आहे, मात्र, सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे, आज या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारक, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, अनेक प्रवाशांना दुखापत होत आहे, विशेषतः गर्भवती महिला, गंभीर आजारी रुग्ण, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना, प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणेही कठीण झाले आहे, शासनाचा लाखो करोडो रुपयांचा निधी खर्च होऊनही, नागरिकांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत असेल, तर या कामाची जबाबदारी कोणाची?, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी कोण घालत आहे?, संबंधित अभियंत्यांनी कामाची गुणवत्ता तपासली होती की, केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखविले आहे?, विशेष म्हणजे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या, नवागाव या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे, आमदार याच रस्त्यावरुन आपल्या गावी जातात, म्हणून प्रशासनाने सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास, बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ नंदुरबार संघटनेकडून देण्यात आला आहे.



