*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना,गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत असल्याच्या तसेच तालुक्यातील नदीपात्रांमधून वाळूसह दगडगोट्यांचा उपसा सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी वाळूची वाहतूक रॉयल्टी व आवश्यक परवानगीशिवाय होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नदी पात्रातील उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी व पारदर्शक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाळूने भरलेला एक डंपर गेल्या चार दिवसांपासून अक्कलकुवा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जप्त केलेल्या स्थितीत उभा असल्याचे दिसून येत आहे. या वाहनावर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली? कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? आणि पुढील कायदेशीर कार्यवाही कोणत्या टप्प्यावर आहे,? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी माध्यमांनी तहसीलदार विनायक घुमरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत कार्यालयात येऊन माहिती घेण्याचे सूचित केले. त्यानंतर कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित कारवाईची माहिती तहसीलदारांकडेच असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, 20 नोव्हेंबर रोजी तहसीलदार तालुक्यात दौऱ्यावर असल्याने माध्यमांना डंपरवरील कारवाईची अद्ययावत माहिती मिळू शकली नाही. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वाहन उभे असताना त्यावरील कारवाईची सद्यस्थिती कार्यालयातील अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट होऊ न शकल्याने या प्रकरणात नेमकी कोणती कार्यवाही झाली,? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डंपर जप्त केल्यानंतर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का,? वाहनमालकाकडून रॉयल्टी अथवा परवानगीची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत का,? याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे. गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये कारवाईची पारदर्शक माहिती उपलब्ध झाल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. वाळूने भरलेला डंपर गेल्या चार दिवसांपासून अक्कलकुवा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जप्त केलेल्या स्थितीत उभा आहे. तहसीलदार विनायक घुमरे यांनी दूरध्वनीवरून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले, तर कार्यालयात संपर्क साधल्यावर संबंधित माहिती तहसीलदारांकडे असल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार दौऱ्यावर असल्याने माध्यमांना डंपरवरील कारवाईची सद्यस्थिती, दंडात्मक कार्यवाही अथवा पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे वाहन जप्त केल्यानंतर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याबाबत प्रशासनाच्या खुलाशाची प्रतीक्षा आहे.



