*मुख्यमंत्री सहायता निधीतून गमन येथे नदिच्या डोहात बुडुन मृत्यू पावलेल्या मुलांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लक्ष रुपये अनुदान वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री सहायता निधीतून गमन येथे नदिच्या डोहात बुडुन मृत्यू पावलेल्या मुलांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लक्ष रुपये अनुदान वाटप*
*मुख्यमंत्री सहायता निधीतून गमन येथे नदिच्या डोहात बुडुन मृत्यू पावलेल्या मुलांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लक्ष रुपये अनुदान वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आमदार आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून नदिच्या डोहात बुडुन मृत्यू पावलेल्या गमन येथील वारसदारांना प्रत्येकी एक लक्ष अनुदान देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे गमण येथील सुनिल खेत्या वसावे व शुभम कैलास वसावे या विद्यार्थ्यांचा 9 जून 2026 रोजी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी एक लक्ष रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आला, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते आमदार कार्यालयात सदर सहाय्यता अनुदानाचे धनादेश मयताचे वारसदार खेत्या नोबल्या वसावे, कैलास खेत्या वसावे यांना वितरित करण्यात आले. सदर पीडित परिवाराच्या सदस्यांना शासनाकडून उचित मदत मिळवून देण्यासाठी, आमदार आमश्या पाडवी यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा तहसिल कार्यालयाचे तहसीलदार विनायक घुमरे, युवा सेना लोकसभा प्रमुख ललित जाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कान्हा नाईक, पृथ्वीसिंग पाडवी, रविंद्र चौधरी लिपिक अजिज शेख, गमनचे सरपंच दंगीबाई वसावे, लालसिंग वसावे, स्विय सहाय्यक रविंद्र गुरव आदी उपस्थित होते.



