*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन e-KYC सुरु बाबत, सोशल मीडियावरील माहिती दिशाभूल करणारी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आनंद जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन e-KYC सुरु बाबत, सोशल मीडियावरील माहिती दिशाभूल करणारी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आनंद जाधव*
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन e-KYC सुरु बाबत, सोशल मीडियावरील माहिती दिशाभूल करणारी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आनंद जाधव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन e-KYC प्रक्रियेला सुरुवात झाल्याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत.व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर काही लिंक पाठवून त्यावर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, या अफवांवर लाभार्थी महिलांनी विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आनंद जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य व पोषणाचा स्तर उंचावण्यासह कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आर्थिक लाभ दिला जात आहे.
शासन स्तरावरून नवीन e-KYC प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अनधिकृत संदेशांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा त्यावर आपली वैयक्तिक व बँक खात्याशी संबंधित माहिती भरू नये. अशा लिंकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आनंद जाधव यांनी केले आहे.



