*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर 22 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर 22 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार*
*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर 22 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) 2026 अंतर्गत गैरहजर, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांच्या नोंदींच्या अनुषंगाने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी निर्धारित वेळापत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले आहेत.18 नोव्हेंबर,2026 पर्यंत गणना पत्रके तयार करुन छपाई करणे, 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2026 दरम्यान गणना पत्रकांचे वितरण व संकलन करणे. 10 डिसेंबर, 2026 पर्यंत गणना प्रपत्रे निकाली काढणे. वरील गणना प्रपत्र बाबतची कार्यवाही करावयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र्रातील विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील वेळापत्रकातही सुधारणा करण्यात आली आहे. आता नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 31 ऑगस्ट ते 15 डिसेंबर, 2026 असून 22 डिसेंबर, 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.



