*शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या द्वितीय सत्राच्या प्रारंभानिमित्त 'शाळा दत्तक पालक अधिकारी' यांच्याकडून आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट व पाहणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या द्वितीय सत्राच्या प्रारंभानिमित्त 'शाळा दत्तक पालक अधिकारी' यांच्याकडून आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट व पाहणी*
*शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या द्वितीय सत्राच्या प्रारंभानिमित्त 'शाळा दत्तक पालक अधिकारी' यांच्याकडून आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट व पाहणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे शैक्षणिक वर्ष 2026-27 चे द्वितीय सत्र नुकतेच सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या सुधारीत कार्यालयीन आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या सर्व 'शाळा दत्तक पालक अधिकारी व कर्मचारी' यांनी 19 नोव्हेंबर 2026 रोजी आपापल्या दत्तक आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर पाहणी केली. भेटीतील प्रमुख उपक्रम व आढावा, शिक्षक व पालक संवाद, दत्तक पालक अधिकाऱ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे, दैनंदिन उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भौतिक सुविधा व स्वच्छतेची तपासणीः शालेय इमारत, मुला-मुलींची वसतिगृहे, शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (आर.ओ. फिल्टर), सोलर यंत्रणा आणि सी.सी.टी.व्ही. प्रणाली कार्यान्वित असल्याची खात्री करण्यात आली. तसेच स्वयंपाकगृह, कोठीगृह आणि संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेत किरकोळ दुरुस्तीची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थी कल्याण व सुरक्षाः विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणारे गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, भोजनाचा दर्जा आणि झोपण्याची व्यवस्था (बंकबेड/गाद्या) यांची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य कार्ड, आरोग्य तपासणी आणि परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.



