*नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांना राज्य अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाचे विविध मागण्याचे निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांना राज्य अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाचे विविध मागण्याचे निवेदन*
*नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांना राज्य अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाचे विविध मागण्याचे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी हरिभाऊ हाके यांना शिष्टमडळाने विविध प्रमुख मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.
यात नवापूर प्रकल्पातील नवापाडा धनराट येथील अंगणवाडी सेविकेच्या विरुद्ध गावगुंडांनी पोषण आहार गटारीत फेकल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसताना, लेखी तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे केल्याने तक्रार खोटी व बनावट असल्याचे, संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, त्याबाबत समन्वय समितीने लेखी स्वरूपाचे निवेदन दिलेले आहे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्ट मंडळाला सांगितले कि योग्य ती चौकशी करून खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर, कारवाई करण्या बाबत पोलीस प्रशासनाला सूचना देईल, अंगणवाडी सेविकेवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे शिष्टमंडळाला सांगितले,
शिष्टमंडळाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक- युवराज बैसाने यांनी केले तसेच या शिष्टमंडळात राजू पाटील, अमोल बैसाणे, वकील पाटील, सुनीता कोकणी, वैशाली गावित झेलू गावित, रंजना गावित, बबिता गावित, मनिषा मोरे, ललिता पेटकर रेखा माळी, सबू पवार हे उपस्थित होते.



