ताजा खबरे:
*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*

  • Share:

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
मुंबई(प्रतिनिधी):-देशातील विविध भागांतील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः मुंबईमध्ये उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. रक्ताच्या एका पिशवीसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक रक्तपेढ्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना निराश होऊन परतावे लागत आहे. ही परिस्थिती केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर रक्तपेढ्या आणि रक्त दात्यांसाठीही चिंतेचा विषय बनली आहे. रक्ताची गरज असल्याचे सांगणारे अनेक फोन कॉल, व्हॉट्सॲप संदेश आणि सोशल मीडिया पोस्ट रक्तदात्यांपर्यंत सातत्याने पोहोचत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत रक्त उपलब्ध नसल्याने रक्तदाते असूनही अनेक वेळा मदत करणे शक्य होत नाही. रक्तदानासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या रक्तदात्यांनाही सध्या असहाय्यतेची भावना जाणवत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा रक्त साठ्यावर परिणाम, थॅलेसेमिया आणि कर्करोग रुग्णांसमोर मोठे संकट डॉ. प्रमेश सी. एस.
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि नियमित रक्तदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात अनेक नियमित रक्तदाते गावी किंवा बाहेरगावी जातात. परिणामी रक्तदानाचे प्रमाण कमी होते. मात्र रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज सुट्ट्यांमध्येही कायम असते. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामधील अंतर वाढत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमेश सी. एस. यांनीदेखील 'X' या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करून रक्ताच्या तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या समस्येचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून देशातील विविध रुग्णालयांमध्येही रक्ताची कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. येत्या काळातही या परिस्थितीचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रक्ताचा तुटवडा सर्वाधिक गंभीरपणे जाणवत आहे तो थॅलेसेमिया, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना. थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. कर्क रोगावरील उपचार, मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण आणि प्रसूती दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्येही रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून अनेक रुग्णांच्या आयुष्याशी जोडलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे.
विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे.स्वत: MSW भीमराव काळे
रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रक्तपेढ्यांनाही अनेक मर्यादांचा सामना करावा लागत आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्तपेढीतील कर्मचारी रुग्णांना रक्त देऊ शकत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा राग अनेकदा रक्तपेढ्यांमधील कर्मचाऱ्यांवर निघतो. याबाबत पल्लवी ब्लड सेंटरचे MSW प्रभारी भीमराव काळे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्त पेढ्यांवर मोठा ताण आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्तपेढीतील कर्मचारीदेखील काही करू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर राग काढण्याऐवजी स्वतः पुढाकार घ्यावा. ज्या रुग्णालयात आपले रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये किंवा मुंबईतील इतर अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये जाऊन स्वच्छिक रक्तदान करावे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र व्यक्तींनी वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदानासाठी पुढे यावे. विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे. स्वतः रक्तदान करण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारातून आणि परिचितांमधून नवीन रक्तदाते निर्माण करावेत. रक्तदानाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे." मंदिरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करा; नेते, मंत्री आणि कलाकारांनीही पुढाकार घ्यावा! अनिल गरे रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सदस्य आणि सक्रिय रक्तदान शिबिरांचे आयोजक अनिल गरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. ते म्हणाले, "ज्या मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते, अशा ठिकाणी योग्य परवानग्या घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांबरोबर रक्तदानाचा संदेश पोहोचवला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री तसेच चित्रपट आणि कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनीही रक्तदानात सक्रिय सहभाग घ्यावा. त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला, तर अनेक तरुण आणि नागरिक प्रेरित होतील." तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे रक्तदाते निलेश कोकमकर, रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे रक्तदाते निलेश महादेव कोकमकर, यांनीही या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आज मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन करत आहेत. रक्तदाते म्हणून आम्हालाही अनेक फोन आणि संदेश येत आहेत. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज आहे, हे समजल्यावर त्याला मदत करण्याची प्रत्येक रक्तदात्याची इच्छा असते. परंतु रक्तपेढ्यांमध्येच रक्त उपलब्ध नसेल, तर आम्ही तरी मदत कशी करणार? ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. आज कोणाला रक्ताची गरज आहे, उद्या ती गरज आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीलाही भासू शकते. त्यामुळे रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर रक्तदाते शोधण्यापेक्षा गरज निर्माण होण्यापूर्वीच समाजात रक्तदाते निर्माण करणे आवश्यक आहे. मुंबईकरांना माझी हात जोडून विनंती आहे की, प्रत्येक तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे. केवळ स्वतः रक्तदान करून थांबू नका, तर आपल्या किमान पाच मित्रांना रक्तदानासाठी प्रेरित करा. आपल्या सोसायटीत, कार्यालयात, मित्रमंडळात आणि सामाजिक संस्थांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करा. आपले एक रक्तदान एखाद्या गरजू रुग्णासाठी जीवनदान ठरू शकते." मुंबईतील विविध सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, कॉर्पोरेट कार्यालये, गृहनिर्माण संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अधिकृत रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
November, 18 2026
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
November, 18 2026
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
November, 18 2026
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
November, 18 2026
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
November, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज