*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ओणी ते पाचल या महत्त्वपूर्ण मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी राजापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, उपविभाग राजापूर यांना सादर करण्यात आले. ओणी ते पाचल हा रस्ता तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांना धुळीचाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्याचबरोबर अनुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर अवजड व हलक्या वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, लहान-मोठ्या अपघातांची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे. तसेच या मागणीवर प्रशासनाने काय कार्यवाही केली, याबाबत लेखी स्वरूपात उत्तर द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी राजापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, शहराध्यक्ष अझीम जैतापकर, राजापूर नगरपरिषदेच्या काँग्रेस नगरसेविका अफरोज झारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाटकर, हारून साठी, निसार मुल्ला आदी उपस्थित होते. ओणी-पाचल रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना दररोज करावा लागणारा त्रास लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



