ताजा खबरे:
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर कोथरूड विभागातर्फे दिवाळी पाडवा उत्साहात साजरा*
*ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तवावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*
*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*

  • Share:

*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
कांदिवली(प्रतिनिधी):-आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि टोलेजंग इमारतींच्या वाढत्या गर्दीत हळूहळू लोप पावत चाललेली चाळ संस्कृती, आपुलकी, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चारकोप कांदिवली परिसरातील काही मंडळे सातत्याने करीत आहेत. मराठमोळे सण- उत्सव एकत्रितपणे साजरे करताना सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या मंडळांमध्ये चारकोप सेक्टर 1 येथील ‘रायझिंग सन क्रिडा उत्सव मंडळा’चे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मंडळाच्या वतीने यंदा दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला  ‘दिपोत्सव 2026’ अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. दिवाळीच्या दरम्यान तसेच त्यानंतरच्या संपूर्ण आठवडाभर रहिवाशांसाठी विविध मनोरंजक, सांस्कृतिक, क्रिडा आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. गेल्या 28 वर्षांपासून मंडळाने ही परंपरा जपत चारकोप परिसरातील नागरिकांना एकत्र आणण्याचे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक नाते अधिक दृढ करण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. 10 नोव्हेंबर रोजी भैरव स्माईल इन्फ्रा प्रोजेक्टचे सर्वेसर्वा निखिल सुर्वे आणि किशोर दळवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी सामाजिक संदेश देणाऱ्या तसेच पारंपरिक विषयांवरील सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या साकारल्या. पंचांनी या रांगोळ्यांचे परीक्षण करून स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक केले.13 नोव्हेंबर रोजी महिला व पुरुष क्रिकेट स्पर्धा तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते केतन धाटावकर आणि शिरीष दहिबावकर यांनी विशेष मेहनत घेतली. यंदाच्या पाककला स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पुरुष स्पर्धकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी एकापेक्षा एक रुचकर आणि खमंग पदार्थांची आकर्षक मांडणी केली होती. मूळच्या वरळी कोळीवाडा येथील असलेल्या सौ. सुचिता चौलकर यांनी यंदाही खास मासळीच्या पदार्थांचा बेत सादर केला. त्यांच्या या खास पाककृतीचा उपस्थित मान्यवरांनीही मनमुराद आनंद घेतला.14 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित रासगरबा कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा आणि उत्कृष्ट नृत्याच्या माध्यमातून सहभागी कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. बालदिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान मुलांना खाऊचे वाटप करून बालदिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या दीपोत्सवात सहभागी होता यावे, याची विशेष काळजी मंडळाने घेतली होती.
दिपोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रशांत प्रिंदावणकर आणि सुधाकर वस्त यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध नवनवीन खेळ आणि मनोरंजक स्पर्धांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात तब्बल 150 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्या, घर आणि नोकरीच्या धावपळीत व्यस्त असलेल्या महिलांना स्वतःसाठी आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, एकमेकींशी संवाद साधता यावा आणि आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजनासाठी विशेष पाठबळ देणारे मनसेचे ‘आपला माणूस’ भूषण अनंत विचारे हे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण आयोजनावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे परिसरातील 14 संस्थांमधील महिलांना या कार्यक्रमाची दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा असते. या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे यापेक्षा एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवणे, मैत्रीचे बंध अधिक दृढ करणे आणि स्वतःमधील कलागुणांना वाव देणे हेच अधिक महत्त्वाचे असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. मंडळाच्या या उपक्रमाचे महिलांनी विशेष कौतुक करून आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. रोषणाईने उजळला संपूर्ण परिसर; सामाजिक एकोप्याचा संदेश दिवाळीनिमित्त संपूर्ण रस्त्यावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई हे दीपोत्सवाचे आणखी एक खास आकर्षण ठरले. रोषणाईने उजळलेला संपूर्ण परिसर, विविध कार्यक्रमांमधील नागरिकांचा उत्साह आणि एकत्रितपणे सण साजरा करण्याची भावना यामुळे चारकोप सेक्टर 1 मध्ये खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत होता. आजच्या काळात सण केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसराने एकत्र येऊन साजरे करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि समाजातील परस्परांचे नाते जपणे, हेच या दीपोत्सवाचे खरे यश म्हणावे लागेल. मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप यांनी सर्व देणगीदार, प्रायोजक, रहिवासी, सहभागी स्पर्धक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून दीपोत्सव यशस्वी
या संपूर्ण  दिपोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी अध्यक्ष राजेश सोरप, चिटणीस अमित पालांडे,खजिनदार सुनीत कदम,राहुल केदारी, निलेश धावडे, श्रीनिवास एन., विशाल पंड्या, संदीप कदम, प्रवीण सावंत, चेतन चौलकर, राजेंद्र परब, अभिजित इळकर, सागर गाढवे, प्रशांत कडू, थोरवे बंधू, अनिल लोखंडे, डॉ. मकरंद गावडे, हरीश सूर्यवंशी, विष्णू आणि पप्प्या यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. सदर दीपोत्सवातील विविध कार्यक्रमांना विशेष रंगत आणण्याचे काम जग्गू यांच्या बहारदार डी.जे. सादरीकरणाने केले. त्यांच्या जोशपूर्ण संगीतामुळे संपूर्ण परिसरातील उत्साह आणि जल्लोष द्विगुणित झाला. मंडळाचे सल्लागार सुधाकर कदम, कमलाकर सक्रे आणि राजेश सोनावणे यांचेही संपूर्ण नियोजन व व्यवस्थापनावर विशेष लक्ष होते
दिपोत्सव म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम नव्हेत, तर माणसा माणसांतील नाती उजळविण्याचा, आपुलकीचे बंध जपण्याचा आणि समाजाला एकत्र आणण्याचा एक सुंदर उत्सव आहे. चारकोपमधील रायझिंग सन क्रिडा उत्सव मंडळ गेली 28 वर्षे याच भावनेतून आपली परंपरा जपत आहे.
टोलेजंग इमारतींच्या युगातही चाळ संस्कृतीतील माणुसकी, एकोपा आणि आपलेपणाचा सुगंध कायम ठेवणारा हा  दिपोत्सव म्हणजे केवळ एका मंडळाचा कार्यक्रम नसून संपूर्ण परिसराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव ठरला आहे!

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
November, 18 2026
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर कोथरूड विभागातर्फे दिवाळी पाडवा उत्साहात साजरा*
November, 18 2026
*ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तवावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
November, 18 2026
*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*
November, 18 2026
*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
November, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज