*ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तवावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तवावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
*ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तवावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ससाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचे कळप आढळून येत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतीचे तसेच काजू कलम बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे वनविभागाने ससाळे परिसराची पाहणी करुन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी सरपंच शोभा गंगाराम तांबे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. ससाळे गावातील लोकवस्तीच्या आसपासच्या परिसरात गवे रेड्याचे कळप आढळून येत आहेत काही दिवसांपूर्वी श्री गांगेश्वर मंदिराच्या समोर जोगलेवाडीत जाणाऱ्या रस्त्यावर पाच गव्यांचा कळप फिरताना ग्रामस्थांना आढळून आला. सकाळच्या वेळी शेतात जाणारे शेतकरी, महिला तसेच गुराखी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे गव्यांचा वावर वाढल्याने शेतीची कामे करणे तसेच परिसरातील ये-जा करणे धोकादायक बनले आहे गव्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे काजू कलमे तुडवणे, झाडांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आधीच नैसर्गिक दृष्ट चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ससाळे परिसराची प्रत्यक्ष पाहणी करुन गव्यांच्या वाढत्या उपद्रवावर उपाययोजना करावी नागरिकांना भीतीमुक्त करावे अशी मागणी माजी सरपंच शोभा तांबे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.



