ताजा खबरे:
*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*

  • Share:

*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन* 

कांदिवली(प्रतिनिधी):-जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने कांदिवली पूर्व येथील दामू नगर परिसरात दत्त मंदिर येथे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘FUN WITH LEARN’ या सहा महिन्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मुलांना खेळातून शिकता यावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि त्यांच्यातील विविध कलागुण ओळखून त्यांना योग्य संधी मिळावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी सांगितले. सामान्यतः कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटन रिबीन कापून केले जाते. मात्र, जहान फाउंडेशनच्या वतीने या प्रकल्पाचे उद्घाटन एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी मुलांना रंगीत कागद देऊन त्यापासून कागदी विमाने तयार करण्यास सांगण्यात आले. तसेच मोठ्या कार्डपेपरपासून एक विमान तयार करून त्यावर मुलांची स्वप्ने आणि इच्छा लिहिण्यात आल्या. हे विमान प्रकल्पाच्या बॅनरजवळ लावण्यात आले. त्यानंतर मुलांनी आपापली छोटी विमाने हवेत उडवली. एका लहान मुलाच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मुलांच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला, अशी माहिती फाउंडेशनच्या खजिनदार श्वेता पाटील यांनी दिली. या सहा महिन्यांच्या प्रकल्पामध्ये मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सोबतच विविध सांस्कृतिक आणि कलात्मक गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. यामध्ये नृत्य, नाटक, पथनाट्य अशा विविध कलांचा समावेश आहे.मुलांची आवड आणि त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना त्या क्षेत्रात शिकण्याची संधी दिली जाणार आहे. AI विषयाचे मार्गदर्शन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक महेश सोनावणे करणार असून, सचिव अस्मिता कहाळे मुलांना नृत्य, नाटक, पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव अस्मिता कहाळे यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उज्ज्वल स्वावलंबी फाउंडेशनचे संस्थापक जितेश शरणागत, उज्ज्वल फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा शरणागत, श्रीक्षा फाउंडेशनच्या संस्थापक व सामाजिक कार्यकर्त्या मनिषा कटरमल, भीमाई मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आम्रपाली काळे आणि धम्म वर्गाचे सहाय्यक कदम उपस्थित होते. तसेच इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक हरिश्चंद्र देसले आणि चेतन कांबळे यांचीही विशेष उपस्थिती होती, अशी माहिती फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक महेश सोनावणे यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून दामू नगर परिसरातील मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची, स्वतःमधील कला ओळखण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता खेळ, कला, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा फाउंडेशनचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असे फाउंडेशनचे बोर्ड मेंबर पवन जोहारे यांनी सांगितले. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी कला आणि एक वेगळे स्वप्न असते. त्या स्वप्नांना योग्य दिशा आणि संधी मिळाली, तर प्रत्येक मूल नक्कीच मोठी भरारी घेऊ शकते, असा विश्वास फाउंडेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर राहुल बनसोडे यांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
November, 18 2026
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
November, 18 2026
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
November, 18 2026
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
November, 18 2026
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
November, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज