*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हजरत फतेह अली शहीद टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त 16 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून गरजूंची सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वच्छता निरीक्षक संदीप अहिरे, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान, कॉंग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी उपस्थित होते. या उपक्रमातून सामाजिक एकोपा, मानवसेवा आणि गरजूंच्या मदतीचा संदेश देण्यात आला.



