*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशभरात 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सहकार सप्ताहाच्या अनुषंगाने सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 17 नोव्हेंबर 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व नोकरदार पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कन्यादान मंगल कार्यालय, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार येथे करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पुरी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नंदुरबार हे होते.
कार्यक्रमास धनंजय डोईफोडे, सहनिबंधक (सेवानिवृत्त) तथा राज्य समन्वयक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, तानाजी कवडे, सेवानिवृत्त सहनिबंधक तथा लेखापरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे, सोपान शिंदे, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, तसेच गिरीश महाले, स. नि., आर. आर. राठोड, स. नि., बी. बी. अहिरे, स. नि. व प्रकाश खैरनार, स. नि. हे मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात धनंजय डोईफोडे, डॉ.सोपान शिंदे व तानाजी कवडे यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान पतसंस्थांच्या कामकाजातील विविध महत्त्वपूर्ण बाबी, कर्ज वसुलीची प्रभावी कार्यपद्धती, थकीत कर्जवसुलीचे महत्त्व तसेच सहकार कायद्यातील विविध नियम, अधिनियम व कलमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम व नियमानुसार चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरही मान्यवरांनी प्रकाश टाकला. या प्रशिक्षणास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरी, ग्रामीण व नोकरदार पतसंस्थांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांना संस्थांचे कामकाज अधिक सक्षमपणे, पारदर्शकतेने व कायदेशीर तरतुदींनुसार पार पाडण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. तसेच कर्जवसुलीची प्रभावी अंमलबजावणी, आर्थिक शिस्त आणि सहकार विषयक नियमांचे पालन याबाबत अधिक स्पष्टता निर्माण होण्यास मदत झाली. निश्चितच, नंदुरबार जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, शिस्तबद्ध व प्रगतिशील करण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.



