*नंदुरबारमध्ये जनगणना-2027 च्या तयारीला वेग, 25जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेला सुरुवात,जनगणना 2027 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये जनगणना-2027 च्या तयारीला वेग, 25जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेला सुरुवात,जनगणना 2027 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न*
*नंदुरबारमध्ये जनगणना-2027 च्या तयारीला वेग, 25जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेला सुरुवात,जनगणना 2027 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या शिरगणनेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात 16 व 17 नोव्हेंबर 2026 रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, चार्ज अधिकारी, मुख्याधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
जनगणना कार्य संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर यांनी जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत स्वयंगणना (Self Enumeration) प्रक्रिया राबविण्यात येणार असून, 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेचे काम करण्यात येणार आहे. या टप्प्यात प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती, त्यांना द्यावयाचे प्रशिक्षण, तसेच सीएमएमएस (CMMS) पोर्टलद्वारे करावयाच्या ऑनलाइन कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चार्ज अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना पोर्टल हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. जनगणनेदरम्यान प्रगणकांमार्फत नागरिकांकडून 40 प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यात येणार असल्याने, या प्रक्रियेतील अचूकता आणि माहिती संकलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जनगणनेचे काम अचूक, काळजीपूर्वक आणि विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी पोर्टलवरील कामकाज गांभीर्याने व दक्षतेने करावे, असे आवाहनही प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे एसआय, जीआर-2 श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते.



