*निवडणूक साक्षरता स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर,जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळामार्फत होणार स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवडणूक साक्षरता स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर,जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळामार्फत होणार स्पर्धांचे आयोजन*
*निवडणूक साक्षरता स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर,जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळामार्फत होणार स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळामार्फत (Electoral Literacy Clubs - ELCs) निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या आयोजनाबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. भावी आणि तरुण मतदारांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे आणि निवडणूक प्रक्रियेबाबत सुजाण व सहभागात्मक संस्कृती निर्माण करणे हा या स्पर्धांमागील मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा शैक्षणिक संस्थास्तर, विधानसभा मतदारसंघस्तर आणि जिल्हास्तर अशा तीन टप्प्यांवर घेतली जाणार आहे. संस्थास्तरीय फेरी: 18 ते 27 नोव्हेंबर, 2026,विधानसभा मतदारसंघस्तरीय फेरी: 7 ते 12 डिसेंबर, 2026, जिल्हास्तरीय अंतिम फेरी 14 ते 18 डिसेंबर 2026,
निकाल जाहीर करणे व प्रमाणपत्र वितरण 19 ते 22 डिसेंबर 2026
संस्थास्तरीय फेरीतून दोन्ही स्पर्धामधून प्रत्येक शाळा व महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ स्तरावरून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10 विद्यार्थी निवडले जातील. मतदारसंघ स्तरावर निवडलेले हे विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी होती. निकाल जाहीर झाल्यानंतर तिन्ही स्तरांमधील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे.



