ताजा खबरे:
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*

  • Share:

*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती, जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026 अंतर्गत नंदुरबार महसूल मंडळातील मौजे दुधाळे (ता. नंदुरबार) येथे विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना शासकीय योजना, दाखले व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. गावातच विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 3 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच 12 उत्पन्नाचे दाखले आणि 15 शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. याशिवाय 1 रहिवासी/अधिवास दाखला, 3 जन्म दाखले आणि 7 मृत्यू दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
'जिवंत 7/12' मोहिमेंतर्गत 16 वारस नोंदी पूर्ण करण्यात आल्या. तसेच 45 महिला शेतकरी प्रमाणपत्रांची नोंदणी करण्यात आली, तर 5 नागरिकांच्या आधारकार्ड अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
अशा प्रकारे एकूण 107 नागरिकांना विविध शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज न पडता गावातच विविध सेवा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
शिबिरादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन अर्ज प्रक्रिया व लाभ मिळविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. आदिवासी व ग्रामीण भागातील पात्र नागरिकांपर्यंत शासकीय योजना सुलभतेने पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
November, 17 2026
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
November, 17 2026
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज