*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जननायक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026’ सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत श्रीरामपूर (ता. नंदुरबार) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. सदर शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या दाखल्यांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करून, शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि शासकीय कार्यालयांशी संबंधित कामकाज सुलभ व गतिमान करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी नागरिकांना उपलब्ध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया व कागद पत्रांबाबतही मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या सामाजिक न्याय, जनजागृती व लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करून सेवा सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासनाने थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ अगदी स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्यास मदत होत आहे. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या योजना व सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



