*न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,पात्र लाभार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा-प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,पात्र लाभार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा-प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार*
*न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,पात्र लाभार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा-प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्यूक्लिअस बजेट) अंतर्गत विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्यूक्लिअस बजेट) अंतर्गत यापूर्वी 2 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी केले आहे.



