*न समजलेले माय बाप कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रम यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न समजलेले माय बाप कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रम यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
*न समजलेले माय बाप कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रम यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदु सेवा सहाय्य समिती दरवर्षी छ. शिवाजी महाराज, धर्मवीर छ. संभाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यासह विविध राष्ट्रपुरुष यांचा शौर्य इतिहास समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य आणि हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन करत असते.यावर्षी 'न समजलेले मायबाप' हा हृदयस्पर्शी कार्यक्रम 12 डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता श्रॉफ हायस्कूल मैदानावर आयोजित केली आहे. या कार्यक्रमाचे व्यापक नियोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ यांची बैठक मोठा मारुती मंदिर सभागृह येथे आयोजित केली होती. पूर्वनियोजन बैठकीत सुरुवातीला पुरोहित विलास जोशी महाराज यांचा हस्ते सभेचा भिंतीपत्रकांचे व हस्तपत्रकांचे वैदिक मंत्र घोषाने विधिवत पूजन करण्यात आले. या बैठकीत कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठ यांनी केला. विस्कळीत होत चाललेली कुटुंब व्यवस्था व आई वडिलांबद्दल कृतघ्न होत असलेल्या समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नंदुरबार येथे आयोजित 'न समजलेले मायबाप'या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वसंत हंकारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बैठकीला उपस्थित हिंदुत्ववादी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यात शहर आणि ग्रामीण भागात भिंतीवर, रिक्षावर पोस्टर्स लावणे, विविध शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थी यांना निमंत्रण देणे, घरोघरी निमंत्रण पत्रिका पाठविणे, ग्रामीण आणि शहरात विविध भागात बैठका घेणे, चौकाचौकात बॅनर्स लावणे, सोशल मिडियावर प्रभावी प्रचार प्रसार करण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठ यांनी केला. विविध जाती समाजाचे अध्यक्ष, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, व्यायाम शाळा, गणेश मंडळाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे सूत्र हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील , राजू चौधरी यांनी मांडले. बैठक यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.



