*लांजा तालुक्यातील शिपोशी येथे 'सह्याद्री हिल्स मॅरेथॉन 2026' उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजा तालुक्यातील शिपोशी येथे 'सह्याद्री हिल्स मॅरेथॉन 2026' उत्साहात संपन्न*
*लांजा तालुक्यातील शिपोशी येथे 'सह्याद्री हिल्स मॅरेथॉन 2026' उत्साहात संपन्न*
लांजा(प्रतिनिधी):-“एक धाव माय मराठी आणि पर्यावरणासाठी” या संकल्पनेच्या अनुषंगाने आयोजित या मॅरेथॉनच्या निमित्ताने 14 नोव्हेंबर 2026 रोजी कोकणातील उच्चविद्याविभुषित केंद्रीय वस्तु तसेच सेवा कर, मुंबई भारत सरकार या विभागात वरिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे व तिमिरातुनी तेजाकडे या कोकणातील शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सत्यवान यशवंत रेडकर यांचे 435 वे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पालक, विद्यार्थी, स्पर्धक यांच्या उपस्थितीत श्री देव गांगेश्वर मंदिर, शिपोशी, ता. लांजा येथे यशस्वीरित्या पार पडले.समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागाने व सहकार्याने 15 नोव्हेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील श्री देव गांगेश्वर मंदिर, शिपोशी येथे न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिपोशी'च्या माजी विद्यार्थी विचार मंचाचे वतीने प्रथमतःच 'सह्याद्री हिल्स मॅरेथॉन' 2026 चे आयोजन करण्यात आले होते. 'एक धाव माय मराठी आणि पर्यावरणासाठी’ या संकल्पनेच्या अनुषंगाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये गावकरी, विद्यार्थी, शिक्षक, युवक- युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवक, व्यावसायिक आणि स्थानिक सस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच सह्याद्री व कोकणाच्या निसर्गरम्य परिसरातील 21.1 किमी च्या मार्गावर महाराष्ट्र तसेच देशाच्या अन्य राज्यांतील मुंबई, ठाणे, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेंगलोर, बडोदा, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील जवळपास 509 धावपटूंनी उत्साहाने भाग घेतला. याचा मूळ उद्देश मराठी भाषेचा आणि मराठी माध्यम शाळांचा गौरव करणे, शिक्षणाला चालना देणे तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता. धावपटूंनी केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा संदेशच नव्हे, तर स्थानिक संस्कृती, शिक्षण आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारीही समोर ठेवली. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी मार्गावर प्रत्येक 2 किमीवर पाणी, ओआरएस व प्राथमिक वैद्यकीय मदत केंद्रांची व्यवस्था होती. तसेच दोन रुग्णवाहिका, डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रहदारी व सुव्यवस्थेसाठी पोलीस विभागाची परवानगी यांचीही तरतूद करण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांनी प्रतिक्रिया देताना सह्याद्री हिल मॅरेथॉन, 2026 चा मार्ग म्हणजे सह्याद्री'ने मावळ्यांना दिलेले आव्हान आहे. भारत तसेच जगभरातल्या ज्या मावळ्यांना अशी धमक आहे त्या मॅरेथॉन धावपट्टूंनी पुढील होणाऱ्या 'सह्याद्री हिल मॅरेथॉन सहभागी होण्यासाठी आवाहन केलेले आहे.



