*विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित,डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित, जनजाती गौरव सेवा सप्ताह अंतर्गत अनेक ग्रामस्थांना झाला लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित,डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित, जनजाती गौरव सेवा सप्ताह अंतर्गत अनेक ग्रामस्थांना झाला लाभ*
*विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित,डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित, जनजाती गौरव सेवा सप्ताह अंतर्गत अनेक ग्रामस्थांना झाला लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह2026 या अंतर्गत आज 16 नोव्हेंबर 2026 रोजी धानोरा येथे घेण्यात आलेल्या विशेष शिबिरात माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित व भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले, तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. उपस्थित ग्रामस्थांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, रहिवास / अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यासह विविध कागदपत्रे पूर्ण करून वितरित करण्यात आले. या शिबिराला तहसीलदार नंदुरबार संतोष डेरे, गटविकास अधिकारी नंदुरबार श्रीमती अर्चना वाघमोळे, नायब तहसीलदार प्रांजल पाटील, धानोरा येथील राजकीय पदाधिकारी, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि धानोरा महसूल मंडळातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, पिवळ्या आणि केसरी कार्ड धारकांना पूर्वी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत होते, परंतु विभाजन केल्यामुळे त्यांच्यापैकी सफेद कार्ड धारकांना धान्य मिळणे बंद झाले. त्यांनी त्यांचे जुने रेशन कार्ड आणि नवीन रेशन कार्ड सबमिट केलं तर, त्या कार्ड धारकांना पुन्हा धान्य मिळणे सुरू होईल. राज्य सरकारने त्याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तरी ग्रामीण जनतेने याचा लाभ घ्यावा; असे आवाहन याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
तर डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत दिली जात असून त्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ते करून घ्यावे, असे आवाहन केले. दरम्यान, शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती शिबिरात देण्यात आली. विविध विभागाकडून योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रे आमदार डॉ गावित यांच्या व सुप्रिया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन केले. तसेच योजनेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.



