*वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश वसई ते पनवेल लोकल मार्गाला रेल्वे बोर्डाची मंजूरी, आता मुंबई लोकल थेट विरार,वसई ते पनवेल पर्यंत धावणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश वसई ते पनवेल लोकल मार्गाला रेल्वे बोर्डाची मंजूरी, आता मुंबई लोकल थेट विरार,वसई ते पनवेल पर्यंत धावणार*
*वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश वसई ते पनवेल लोकल मार्गाला रेल्वे बोर्डाची मंजूरी,आता मुंबई लोकल थेट विरार,वसई ते पनवेल पर्यंत धावणार*
विरार(प्रतिनिधी):-वसई ते पनवेल मार्गावर भिवंडी हे मुंबई लगतचे सर्वात मोठी गोडाऊन असल्याने या मार्गावर प्रवासी संख्या जास्त व मेमू रेल्वेची संख्या कमी असल्याने वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने डहाणू रोड ते वसई ते पनवेल हा रेल्वे मार्ग लोकलने जोडावा अशी आग्रही मागणी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधींकडे करण्यात येत होती याला आत्ता यश मिळताना दिसत आहे. वसई ते पनवेल रेल्वे मार्गाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. आज मुंबईत फक्त कंपन्यांची ऑफीसेस आहेत याची सर्वच्या सर्व गोडाऊन बोईसर, पालघर, वसई व भिवंडी परिसरात असल्याने डहाणू ते वसईमार्गे पनवेल मार्गावर लोकल सुरू करणे खूप महत्वाचे होते. हा मार्ग मुंबई उपनगरांच्या पूर्णतः बाहेरून जात असल्याने याचा फायदा दाट लोकवस्ती असलेल्या विरार, नालासोपारा व वसई परिसरातील स्थानिकांना होणार आहे. तर या नवीन मार्गामुळे पश्चिम, मध्य व हर्बर लाईन मार्गावरील प्रवासी भारमान कमी होऊन येथील गर्दी कमी होण्यास मदत होईल. मुंबईच्या बाहेरून जाणारा हा रेल्वेमार्ग पालघर, ठाणे व रायगड जिल्हयांना जोडणारा असल्याने भविष्यात येथे येऊ घातलेल्या पालघर विमानतळ, बुलेट ट्रेन, मेट्रो व वसई रोड टर्मिनसची कामे पूर्ण झाल्यास वसई विरार हा परिसर मोठा ट्रान्सपोर्ट हब म्हणून ओळखला जाईल.



