*रवि राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त देऊरमध्ये वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, 23 नोव्हेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रवि राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त देऊरमध्ये वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, 23 नोव्हेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन*
*रवि राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त देऊरमध्ये वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, 23 नोव्हेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील देऊर गावातील रहिवाशी रवि राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त 23 नोव्हेंबर रोजी देऊर येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थ व रवि राजपूत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात 1 हजार पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भोजन, तर रात्री 8 ते 18 या वेळेत व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. प्रभावी वक्तृत्वशैलीसाठी परिचित असलेले वसंत हंकारे आपल्या व्याख्यानातून सामाजिक जाणीव, जीवनमूल्ये, शिक्षणाचे महत्त्व, पालकांचे योगदान आणि तरुण पिढीची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारप्रवर्तक व्याख्यानातून विद्यार्थी, तरुणाई आणि पालकांना नवी प्रेरणा मिळण्याची अपेक्षा आहे.
वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
परिसरातील तरुण-तरुणी, ग्रामस्थ, माता-भगिनी, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



