*विरारमध्ये भरलेल्या यंगस्टार्सच्या भव्यदिव्य किल्ले स्पर्धेत पापडीतील खांदेरी किल्ला प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विरारमध्ये भरलेल्या यंगस्टार्सच्या भव्यदिव्य किल्ले स्पर्धेत पापडीतील खांदेरी किल्ला प्रथम*
*विरारमध्ये भरलेल्या यंगस्टार्सच्या भव्यदिव्य किल्ले स्पर्धेत पापडीतील खांदेरी किल्ला प्रथम*
विरार(प्रतिनिधी):-वसई तालुक्यातील यंग स्टार्सने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्यदिव्य अशी किल्ले स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत तब्बल 65 सोसायट्या व सार्वजनिक मंडळ सहभागी झाले.शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले नष्ट होत चालली बरेच किल्ले नेस्तनाबूत होत असताना नव्या पिढीला त्याची माहिती व्हावी.मुलांनी दिवाळीच्या सुट्टीत मोबाईल मध्ये गुंतून न राहता विटा दगड मातीत रमून किल्ले बनवावे अशी दूरदृष्टी लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि समन्वयक तथा महापौर मा अजीव पाटील यांच्या संकल्पनेतून जलदुर्ग व भुदुर्ग स्पर्धेचे आयोजन केले होते. एकापेक्षा एक किल्ले उभारली होती.यामध्ये वय वर्ष 5 ते 65 गट सहभागी होत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काही पुस्तक वाचून किल्ले बनवले होते. माहिती सांगत असताना त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. इतिहासप्रेमी योगेश सुळे सर यांनी किल्ल्याचे परीक्षण केले. प्रथम क्रमांक पापडीतील खांदेरी किल्ल्याने पटकावला, द्वितीय क्रमांक शिवबा मित्रमंडळ नालासोपारा विजयदुर्ग तर संस्कृती साधना प्रतिष्ठान विरार रायगडला तृतीय क्रमांक मिळाला किरकिरा बॉयइज नालासोपारा विजयदुर्ग व नार्वेकर भवन किल्ला कंधारचा कृष्णदुर्ग विरार यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले तसेच खास पारितोषिक मोरया प्रतिष्ठान विरार पूर्व, सिंहगड, राजवडी तांडेल पाडा तोरणा किल्ला यांना मिळाले. लवकरच बक्षीस समारंभ होणार असून आपणास कळविण्यात येईल.सर्वांना सहभाग प्रमाणपत्र बक्षीस समारंभाच्या वेळी मिळणार आहे
परीक्षक मिलिंद पोंक्षे, भूषण चुरी सुरेखा कुरकुरे यशस्वी पाहणी करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.



