*विसरवाडी मंडळात भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह साजरा,विविध शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विसरवाडी मंडळात भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह साजरा,विविध शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना वितरण*
*विसरवाडी मंडळात भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह साजरा,विविध शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत मंडळ अधिकारी विसरवाडी यांच्या कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, उत्पन्नाचे दाखले तसेच ऑनलाइन रेशनकार्ड सेवांचा लाभ देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी विलास चौरे, महसूल सहाय्यक प्रमोद डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी रविकिरण गांगुर्डे, निलेश मराठे, सुधाकर पवार, प्रीती वसावे, रणजित गावित, उमेश पाडवी तसेच महसूल सेवक उपस्थित होते. जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.



