*मार्लेश्वर दुर्घटना महाराष्ट्र शासनाकडे 'आधुनिक सुरक्षा अभियान' राबवावे मारळ गावचे मुंबईकर ग्रामस्थ, समाजसेवक अजित गोरुले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मार्लेश्वर दुर्घटना महाराष्ट्र शासनाकडे 'आधुनिक सुरक्षा अभियान' राबवावे मारळ गावचे मुंबईकर ग्रामस्थ, समाजसेवक अजित गोरुले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*मार्लेश्वर दुर्घटना महाराष्ट्र शासनाकडे 'आधुनिक सुरक्षा अभियान' राबवावे मारळ गावचे मुंबईकर ग्रामस्थ, समाजसेवक अजित गोरुले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी*
देवरुख(प्रतिनिधी):-संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे डोंगरावरून दगड कोसळून सहा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मारळ गावचे मुंबईकर ग्रामस्थ आणि समाजसेवक अजित सीता गंगाराम गोरुले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
महाराष्ट्रातील मार्लेश्वरसारखी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक गड- किल्ले सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आधुनिक आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे गोरुले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जोपर्यंत जीवितहानी होत नाही, तोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही, ही उक्ती पुन्हा खरी ठरणार का?" असा सवाल उपस्थित करत दुर्घटना घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच ती रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मार्लेश्वर देवस्थान परिसराचे तातडीने वैज्ञानिक सुरक्षा ऑडिट करावे, डोंगरावरील धोकादायक भागांचे भूगर्भ शास्त्रज्ञांकडून सर्वेक्षण करावे आणि आवश्यक संरक्षक उपाययोजनांसाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ पारंपरिक पद्धतीने संरक्षक भिंती किंवा लोखंडी जाळ्या उभारण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर गोरुले यांनी भर दिला आहे. AI आधारित मॉनिटरिंग सिस्टीम, स्मार्ट सेन्सर, ड्रोनद्वारे डोंगर उतारांचे सर्वेक्षण, 3D डिजिटल मॅपिंग, CCTV आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या माध्यमातून संभाव्य दुर्घटनांची पूर्वसूचना मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व डोंगराळ तीर्थक्षेत्रे, धबधबे, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे राज्यव्यापी सुरक्षा ऑडिट करून 'महाराष्ट्र तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ आधुनिक सुरक्षा अभियान' या नावाने स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या योजनेत भूगर्भशास्त्रज्ञ, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्यांचा सहभाग असावा. प्रत्येक पर्यटनस्थळासाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आज एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला आहे. उद्या अशा दुर्घटनेत आणखी कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये. दुर्घटना घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच ती रोखणे हेच जबाबदार प्रशासनाचे कर्तव्य आहे. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये, हीच त्या निष्पाप चिमुकलीला खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना अजित गोरुले यांनी व्यक्त केली.



