*निवृत्ती वेतनधारकांसाठी 19 व 20 नोव्हेंबरला डिजिटल हयातीचा दाखला मेळावा मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवृत्ती वेतनधारकांसाठी 19 व 20 नोव्हेंबरला डिजिटल हयातीचा दाखला मेळावा मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन*
*निवृत्ती वेतनधारकांसाठी 19 व 20 नोव्हेंबरला डिजिटल हयातीचा दाखला मेळावा मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्ती वेतनधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व 20 नोव्हेंबर 2026 रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. हा मेळावा पेन्शनर्स भवन, गांधीनगर, नंदुरबार येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने कसा सादर करावा, याबाबत निवृत्ती वेतनधारकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, स्वतःच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष हयातीचा दाखला सादर करण्यासाठी तांत्रिक मदतही उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे, अपर कोषागार अधिकारी (नि.वे.) दिलीप बागुल आणि पेन्शनर्स संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



