*3 घरफोडीचे गुन्हे उघड, वेग-वेगळ्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी व 2 अल्पवयीन बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कामà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*3 घरफोडीचे गुन्हे उघड, वेग-वेगळ्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी व 2 अल्पवयीन बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कामà
*3 घरफोडीचे गुन्हे उघड, वेग-वेगळ्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी व 2 अल्पवयीन बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-21 ऑक्टोबर 2026 रोजी 11 ते दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी 6:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील फिर्यादी राहत असलेल्या घर क्रमांक 75, स्वामी समर्थ नगर कोरोट नाका रोड, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने फिर्यादीच्या घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन एकूण 62, हजार 500 रुपये रोख, चांदीचे दागीने व साड्या चोरून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 876/व2026 भा.न्या. संहिता 2023 चे कलम 305 (अ), 331 (3), 331(4) प्रमाणे दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी 13:08 वाजता गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार मार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय बातमीदार, सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत इसम नामे परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर व त्याचा पुतण्या राजसिंग लखनसिंग शिकलीकर, दोन्ही रा. म्हाडा कॉलनी, एकता नगर, नंदुरबार, ता.जि. नंदुरबार यांनी केलेला आहे.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयीत इसमांचा नंदुरबार शहरात शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत अधिक माहिती मिळाली की, वरील दोन्ही संशयीत हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील करजकुपा चौकातुन नंदुरबार शहरात येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने करकुपा चौकात सापळा लावून एक अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरात त्याचे काका नामे परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर रा. म्हाडा कॉलनी, एकता नगर, नंदुरबार याचेसोबत मिळून घरफोडी केलेबाबत कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून 60 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चोरी केलेला उर्वरीत मुद्देमालाबाबत विचारपुस करता चांदीचे दागिने व साड्या हे त्याचा काका परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर याचेकडे असल्याचे सांगितले. सदर अल्पवयीन बालक व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील शितपेय निर्मितीच्या गोडावूनमधून दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 ते दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान 18 हजार रु. किंमतीचे फिलींग मशिन मोटर, 18 हजार रु. किंमतीची फिलींग मशिन प्रेशर पंप, 15 हजार रु. किंमतीचे फिलींग मशिन कार्बनेटर टँक, 8 हजार रु.किं.चे होमोनायझर प्रेशर वॉल, 30 हजार रु. किं.चे ऑक्सीनेटर मशिन, 4 हजार रु.किं.चे थ्रिफेज वॉयर, 30 हजार रु.किंची स्टील पाईप कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या समंतीशिवाय लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेलेबाबत गुन्हा नोंद आहे. दिनांक 11 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवी अनिल पाडवी वय 27 वर्षे, रा. सोरापाडा (डाबरा) ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार 2) मंगलसिंग दशरथ पाडवी वय 25 वर्षे, रा.सोरापाडा (डाबरा) ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून, 15 हजार रु. किंचे फिलींग मशिन कार्बनेटर टैंक, 30 हजार रु. किंमतीत ऑक्सीनेटर मशिन, 30 हजार रु. किंमतीचे स्टील पाईप असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्गत करुन आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. नवापूर येथील करंजी ओवारा, नयाहोंडा येथे राहणारे फिर्यादी दिनेश बापड्या मावची (वय 39, व्यवसाय -मिस्तरी काम) हे आपल्या कष्टाच्या कमाईतून पैसे साठवत होते. 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची दोरी कापून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरात ठेवलेला पैशांचा पत्राटी डबा (ज्यात 25 हजार रोख होते) व 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 40 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी 17 नोव्हेंबर रोजी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक अल्पवयीन बालकाला नवापूर बस स्थानक परिसरातून ताब्यात घेवून रोख रक्कम 12 हजार रुपये व 15 हजार रुपये किमतीचा Itel कंपनीचा मोबाईल असा एकूण 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अल्पवयीन बालक व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 2 आरोपी व 2 अल्पवयीन बालक यास ताब्यात घेवून दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उप निरीक्षक महेश निकम, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, जितेंद्र तांबोळी, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक चेतन साळवे, राहुल बोराळे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, मनोज महाजन, राहुल पांढारकर, भरत उगले, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी महिला पोलीस अंमलदार रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे.



