*भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी,विश्व हिंदू परिषदेतर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी,विश्व हिंदू परिषदेतर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी,विश्व हिंदू परिषदेतर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
तळोदा(प्रतिनिधी):-भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद स्वामी विवेकानंद साप्ताहिक सत्संग मंडळ, तळोदा यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले तसेच उपस्थितांनी अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य राजाराम राणे सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, समाजजागृती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन हे अन्यायाविरुद्ध संघर्ष, समाजाच्या अस्मितेचे रक्षण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा विशेष संपर्क सहप्रमुख राजेश चौधरी, माजी जिल्हा प्रमुख सेवा प्रमुख डॉ. शांतीलाल पिंपळे, मोहन भैय्या रघुवंशी, प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख विजय सोनवणे, शिरीष माळी, पतंजली जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे, मुकेश जैन, कीर्तीकुमार माळी, मनमोहन परांडे यांच्यासह चिंतेवाड येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भगवान बिरसा मुंडा यांच्या त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.



