*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीच्या संदर्भाने आ.डॉ.विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीच्या संदर्भाने आ.डॉ.विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीच्या संदर्भाने आ.डॉ.विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीच्या संदर्भाने निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच विविध विषयांवरील एकमेकांची मते जाणून घेतली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजाती गौरव दिनाच्या प्रमुख सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नंदुरबार दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान, कार्यक्रमांची व्यस्तता असताना देखील त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी येऊन आवर्जून भेट घेतली. माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून स्थानिक प्रश्न तसेच अन्य माहिती त्यांनी जाणून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे, आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सोनवणे, प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते.



